अभिनेत्री दिशा पाटनी आदित्य ठाकरेंबद्दल म्हणाली...

महाराष्ट्राचे विद्यमान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांच्या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्यात काहीतरी चालले असल्याच्या चर्चा रंगताना दिसतात. अनेक मुलाखतींमध्ये या दोघांना याविषयी प्रश्न विचारले गेले असता आमच्यात केवळ निखळ मैत्री असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे.

दिशा पाटनी सध्या आगामी सिनेमा मलंगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या ती अनेक ठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. 7 फेब्रुवारी रोजी मलंग सिनेमा रिलीज होणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत दिशानं पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.


दिशाला प्रश्न विचारण्यात आला की, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या पदावर आहेत. तुझ्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. तेव्हा यावर उत्तर देताना दिशा म्हणाली, 'आदित्य माझा चांगला मित्र आहे. त्याच्यावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. आदित्यसारखा यंग लिडर महाराष्ट्राला मिळाला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.'

पुढे म्हणाली, 'आदित्य पर्यावरण संवर्धनासाठी खूप काही करत आहे. खास करून जंगलं वाचवण्यासाठी त्यानं चांगले निर्णय घेतले आहेत. मला आदित्यवर विश्वास आहे आणि महाराष्ट्र आता सुरक्षित हातात आहे. त्यानं मुंबईच्या नाईट लाईफलाही चालना दिली आहे. तुम्ही रात्री उशीराही आता बाहेर जाऊ शकता, फिरू शकता, सिनेमा पाहू शकता. या संकल्पनेवर त्यानं बरीच मेहनत घेतली आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या