उदयनराजेंना वाढदिवशी भाजप देणार स्पेशल गिफ्ट...

Image may contain: 2 people, including Bhau Gawari, people smiling, people standingसातारा, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले साताऱ्याचे माजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्ली वारी निश्‍चित मानली जात आहे.


येत्या २४ फेब्रुवारीला भोसले यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून भाजपकडून त्यांना २४ फेब्रुवारीला राज्यसभेवर घेण्याची आणि मंत्रीपद देण्याची घोषणा होणार आहे.उदयनराजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी,त्यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली आहे.

एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर एप्रिलमध्येच उदयनराजेंची निवड करण्यात येणार आहे.अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही.या परिस्थितीत आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपाने सुरू केलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात आणखीनच बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या