वाकोला परिसरात महिलेची हत्या दोघांना अटक...

Image may contain: textमुंबई, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): वाकोला परिसरात एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार,सांताक्रूझच्या मिलिंद नगर परिसरात एका खोलीतून उग्र वास येत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षावर गुरुवारी सकाळी आला.त्यानुसार,वाकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ज्या घरातून वास येत होता त्याचा दरवाजा तोडून पोलीस आत शिरले.तेव्हा त्यात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांना दिसला.त्यांनी ताबडतोब एक रुग्णवाहिका बोलावत तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.ही महिला जवळपास अठ्ठावीस वर्षांची असून तिच्या तोंडातून रक्त येत होते.तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविला.त्यावेळी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या