जामिनावर सुटताच पीडितेच्या घरी पोहोचला आणि…

शिक्रापूर, ता. 8 फेब्रुवारी 2020: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पुन्हा पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येथे समोर आली आहे. आरोपी अटकपूर्व जामिनावर बाहेर होता. गुरुवारी आरोपी पीडित महिलेच्या घरी पोहोचला आणि पुन्हा एकदा बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला असता तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


राहुल वाळके याने पीडित महिलेवर याआधी बलात्कार केला होता. पतीकडून पैसे उधार घेतल्याच्या फायदा घेत त्याने महिलेशी मैत्री करत वारंवार बलात्कार केला होता. यासाठी त्याने जादूटोण्याचा फायदा घेतला होता. पीडित महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अटकपूर्व जामीन मिळाल्याने तो मोकाट होता.यानंतरही राहुल वाळके पीडित महिलेला त्रास देत होता. गुरुवारी त्याने पीडितेच्या घऱी जाऊन बलात्काराचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या