कतरिना कैफ च्या नात्याबद्दल काय बोलला विकी कौशल...

Image may contain: 2 people, people smiling, beard
मुंबई, ता. ८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अभिनेता विकी कौशलनं फार कमी वेळात बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आपली जागा तयार केली आहे.'मसान' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकीनं प्रेक्षकांची मनं जिंकली ती त्याच्या 'उरी' सिनेमातून.काही दिवसांपूर्वीच विकीचा आगामी सिनेमा भूतचा ट्रेलर रिलीज झाला.ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.पण आता विकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते कतरिना कैफसोबतच्या नात्यामुळे.


मागच्या काही काळापासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत.पण आता पहिल्यांदाच विकी या नात्याबद्दल उघडपणे बोलला आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीला कतरिनातसोबतच्या त्याच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना विकी म्हणाला, 'मला नाही वाटत यामध्ये लपवण्यासारखं आहे किंवा मी यावर काही स्पष्टीकरण देण्यासाठी काही बाकी आहे असंही मला वाटत नाही.

मला खोट अजिबात बोलता येत नाही आणि मी माझ्या नात्याबद्दल कधीच कोणापासून लपवून ठेवलेलं नाही.विकी कौशल पुढे म्हणाला, 'मी माझ्या पर्सनल लाइफमध्ये मी कधीच कोणत्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या नाहीत आणि प्रेमाबद्दल बोलायचं तर प्रेम हे माझ्यासाठी सर्वात सुंदर भावना आहे.' विकी कौशलनं मागच्या वर्षी करण जोहरच्या चॅट शोमध्ये कतरिना कैफवर त्याची क्रश असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती.

काही दिवसांपूर्वी विकीचा भाऊ सनी कौशलच्या व्हिडीओ साँगच्या रिलीजला कतरिनानं हजेरी लावली होती.हे दोघंही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिवसतात.उरी सिनेमाच्या यशानंतर विकी कौशलनं अभिनेत्री हरलीन सेठीसोबत नात्यात असल्याचं कबुल केलं होतं मात्र त्यानंतर काही दिवसांतच या दोघांच्या नात्यात दुरावा आला.तर कतरिना याआधी अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.पण २०१७ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं.सध्या कतरिना आणि विकी एका रोमँटिक सिनेमात काम करत आहेत.ज्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या