राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काय आहे विचार...

Image may contain: 1 person, smiling, standingपुणे, ता. ८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुण्यातले रचनात्मक दृष्टीनं चुकीच्या पद्धतीनं बांधलेले पूल तोडून त्याठिकाणी नवीन आणि मोठ्या स्वरूपाचे उड्डाणपूल उभारण्याचा विचार आहे.पुण्यातली मेट्रो प्रकल्प सुनियोजितपणे मार्गी लावण्यासाठी पुलांची पुनर्रचना करणं अतिशय गरजेचं आहे.अशानं भविष्यातली वाहतूक कोंडीही टाळणं शक्य होईल.असा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या झोपडपट्टी धारकांना सर्व सुविधायुक्त हक्काची घरं मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.वर्षभरात अधिकाधिक घरं देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्क्रमात ते बोलत होते.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिध्द असणारे पुणे तसेच इथल्या नागरिकांच्या हिताचे निर्णय शासन गतीनं घेणार आहे. मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची कामं निधीअभावी रखडू नयेत, यासाठी वेळेत निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

प्राधिकरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांना चांगल्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले. 'झोपु'चं हे कार्यालय जास्त काळ इथे राहू देणार नाही.हे कार्यालय सरकारी जागेत हलवावं. १२ लाख रुपये प्रति महिना भाडं मोजून हे कार्यालयं घेतलं हे बरोबर नाही.असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या