देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच...

Image may contain: 1 person, eyeglassesमुंबई, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार हिंदू समाज आहे.केवळ साक्षी नाही तर त्याच कारण पण हिंदू समाज आहे.देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे.जगाला समन्वयाच्या मार्गावर चालायला शिकवण्याचे दायित्व भारत आणि हिंदू समाजावर आहे.

भारतासारखा अत्याचार कोणत्याही देशावर झालेला नाही.परकीय आक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही भारताने आपले अस्तित्व टिकवून ठेवलं.भारत अनंत काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे.हे भारताचे भाग्य आहे,असं जोशी यांनी म्हटलं आहे.गोव्यात आयोजित 'विश्वगुरु भारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमात जोशी बोलत होते.

देशाचं आणि हिंदुंचं भाग्य एकच असून,नाकारात्मकतेला हिंदू समाजामध्ये स्थान नाही,असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांनी केलं आहे.भारत कधी संपणार नाही, हिंदू समाज नष्ट होणार नाही.समाजातील प्रश्न समजणारे आणि प्रश्नावर उत्तर शोधणारे स्वयंसेवक संघाने निर्माण केलं असल्याचंही जोशी यांनी यावेळी बाेलताना सांगितलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या