मद्यपी मुलाचा गुणवरेत बापाकडून खून...

Image may contain: textफलटण, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): दारू पिऊन घरातील सर्वांनाच सतत त्रास देणाऱ्या मुलाला जन्मदात्याने कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना फलटण तालुक्‍यातील गुणवरे येथे घडली.सुभाष लक्ष्मण नाळे (वय ३८) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून लक्ष्मण बाळू नाळे असे खून करणाऱ्या बापाचे नाव आहे.गुणवरे येथील सुभाष नाळे हा युवक दारुच्या व्यसनात पुरता गुरफटला होता.

कुटुंबीयांना वारंवार होणाऱ्या मुलाच्या त्रासामुळे वैतागलेल्या लक्ष्मण नाळे यांनी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरातील कुऱ्हाड घेतली आणि ते मुलगा सुभाषच्या खोलीत गेले आणि झोपलेल्या सुभाषवर कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला.बापानेच मुलाचा खून केल्याच्या घटनेने गुणवरेसह परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शंकर बाळू नाळे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करत आहेत.दररोज दारु पिऊन घरी यायचं आणि कुटुंबीयांना त्रास द्यायचा असा प्रकार सुभाषकडून सुरु होता.सुभाषचे लग्न झाले असून त्याला दोन मुले देखील आहेत.सुभाष दारु पिऊन घरी आल्यानंतर पत्नीसह वडिल तसेच बहिणीला त्रास देत असते.

नाळे कुटुंबीयांसाठी हा त्रास आता नित्याचीच बाब झाली होती.त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रासले होते.शुक्रवारी सुभाषची पत्नी मुलांना घेऊन परगावी नातेवाईकांकडे गेली होती.त्यामुळे घरी वडिल आणि सुभाष दोघेच होते.नेहमीप्रमाणे सुभाष दारु पिऊन घरी आला,तसेच त्यांना वडिलांशी नेहमीप्रमाणेच वाद घातला आणि त्याच्या खोलीत जाऊन झोपला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या