अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरणी एकास अटक

Image may contain: 1 person, smiling

रांजणगाव गणपती, ता. ९ फेब्रुवारी २०२० (तेजस फडके): अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरणी साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तोच गुन्हा रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे वर्ग झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे.मानसी नाईक तिने डॉक्टर संतोष पोटे व सुनीता पोटे तसेच एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा नोंदवला होता.


डॉक्टर संतोष पोटे व सुनीता पोटे यांना अटकपूर्व जामीन झाला असून त्या अज्ञात व्यक्तीला रांजणगाव पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट या ठिकाणाहून अटक केले आहे.या अज्ञात व्यक्तीचे नाव अजय कल्याणकर (वय २३ रा. पर्वतीदर्शन ता. हवेली जि. पुणे) असून हा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करतो.


अभिनेत्री मानसी नाईक यांच्या छेडछाड प्रकरणाशी युवासेनेचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.५ फेब्रुवारी रोजी युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रांजणगाव या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मानसी नाईक परफॉर्मन्स करण्यासाठी आलेल्या असताना त्यांच्याशी अजय कल्याणकर या व्यक्तीने छेडछाड केली.

या संदर्भात पुढील तपास पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय दौंड पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम पोलीस नाईक अजित भुजबळ मंगेश सगळे किशोर तेलंग प्रफुल्ल भगत पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद देवरे अमोल नलगे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या