'तान्हाजी' नंतर ओम राऊत घेणार 'हा' नवा सिनेमा...

Image may contain: 1 person, beard, outdoor and closeupमुंबई, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या सिनेमाद्वारे ओम राऊत यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.ओम राऊत यांचा हा पहिलाच सिनेमा असा काही गाजला की,या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर द्विशतक गाठले.साहजिकच,'तान्हाजी' नंतर ओम राऊत नवा कुठला प्रोजेक्ट घेऊन येणार,याबद्दलची सर्वांचीच उत्सुकता वाढली होती.तर आता ओम राऊत यांच्या दुस-या चित्रपटाची घोषणा झाली आहे.

ओम राऊत- कार्तिक आर्यन आणि भुषण कुमार हे त्रिकुट रूपेरी पडद्यावर काय धम्माल करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कार्तिक आर्यनचा 'लव्ह आज कल २' हा सिनेमा येत्या १४ तारखेला प्रदर्शित होतोय.सध्या कार्तिक 'भुल भुलैय्या २'मध्ये बिझी आहे.हा सिनेमा वेगळा करताच कार्तिक ओम राऊत यांच्या अ‍ॅक्शनपटात बिझी होणार आहे.कार्तिकचा हा पहिला अ‍ॅक्शन चित्रपट असेल.

ओम राऊत 'तान्हाजी'नंतर एक थ्रीडी अ‍ॅक्शनपट घेऊन येणार आहेत.काही तासांपूर्वी या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली.विशेष म्हणजे,यात सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे.कार्तिक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.यात तो धमाकेदार अ‍ॅक्शन करताना दिसेल.टी-सीरिजचे भुषण कुमार त्याची निर्मिती करणार आहेत.

अद्याप या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे.हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार,हेही गुलदस्त्यात आहे.पण हो,चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.ओम राऊत यांच्या 'तान्हाजी' या चित्रपटाने आत्तापर्यंत २६३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.अद्यापही या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे.आता त्यांचा अ‍ॅक्शनपट काय कमाल करतो ते बघूच.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या