हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीचा अखेर मृत्यू...

Image may contain: 1 person
वर्धा, ता. 10 फेब्रुवारी 2020: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडित तरुणीने आज (सोमवार) सकाळी 6.55 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर तरुणीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. गेल्या दोन दिवस तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज सकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचे निधन झाले.

रविवारी रात्रीपासूनच तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. यावेळी तिच्या हृदयाचे ठोकेही कमी झाले होते आणि रक्तदाब देखील कमी झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तरुणीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही आणि आज तरुणीची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, आरोपीला जीवंत जाळा अशी मागणी केली आहे.


जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिेजे. आरोपीला आमच्या स्वाधीन करा, अशी उद्दीग्न प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच निर्भयाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यास ज्याप्रमाणे उशीर होत आहे, तसे न होता लवकरात लवकर आरोपीला शिक्षा द्या, असेही ते म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?
एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न ३ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ही घटना घडली होती. आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने भररस्त्यात प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक देखील केली होती या प्रकरणी पीडित तरूणीला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतही देण्यात आली होती.

पीडित तरूणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेले आठवडाभर तरुणी मृत्यूशी झुंज देतं होती. गेल्या दोन दिवसांपासून तिची प्रकृती प्रचंड चिंताजनक होती. अखेर आज सकाळच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. या हल्ल्यात पीडितेचा संपूर्ण चेहरा जळला होता. यामुळे तिला आपले डोळे आणि वाचाही गमवावी लागली होती.


तोंड आणि नाकातून मोठ्या प्रमाणात धूर तिच्या शरीरात गेल्यानं तिच्या फुफ्फुसांवर परिणाम झाला होत. तसेच तिचे शरीर आतून जळाले होते. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. मागील दोन दिवस तिला कृत्रिमरित्या ऑक्सिजन पुरविण्यात येत होता.आरोपीच्या कृत्याचा राज्यभरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जात आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ ४ फेब्रुवारीला सर्वपक्षीयांकडून हिंगणघाट बंद पुकारण्यात आला होता. तसंच सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील विद्यार्थीही या मोर्चात सहभागी झाले होते.

'आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही' असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. तसेच 'मुलाला आमच्या स्वाधीन केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही. त्याला देखील जिवंत जाळा. त्याला जिवंत जाळल्याशिवाय मुलीच्या आत्माला शांती मिळणार नाही' अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच 'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.

'जो त्रास माझ्या मुलीला झाला तोच त्रास त्याला देखील झाला पाहिजे. मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. त्याला देखील जिवंत जाळा. निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखं नको, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी' असं पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने देखील म्हटलं होतं.

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

'अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत'.
- सुप्रिया सुळे

'हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला. जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून जेव्हा तिला न्याय मिळेल तेव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल'.
- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या