इंदिरानगर येथे हा प्रकार घडकीस आला...

Image may contain: text
पुणे, ता. १० फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या अनुदानित घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे उघडकीस आला आहे.या प्रकरणी स्थानिक नगरसेवकाच्या भावासह एक गॅस एजन्सी मालक व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यातील भारत ओसवाल हा या भागातील नगरसेवकाचा भाऊ आहे.

अनुदानिक घरगुती गॅस सिलेंडर घेऊन त्यामधील गॅस व्यावसायिक सिलींडरमध्ये भरून चढ्यादराने विक्री होत होती.राजू ऊर्फ राजाराम भवरलाल विष्णोई,भारत ओसवाल आणि हिंदुस्थान कंपनीचा या भागातील गॅस वितरक एजन्सी मालकावर याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलीस हवालदार शशिकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

ज्या ठिकाणी हा प्रकार सुरू होता,ती जागा ओसवाल यांची आहे.याबाबत पोलीस हवालदार शशिकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे.७ फेब्रुवारीला गॅस भरण्याचे काम सुरू असताना येथील एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने आरोपी राजु ऊर्फ राजाराम भवरलाल विष्णोई हा जखमी झाला आहे.या घटनेचा तपास उपनिरीक्षक पी.एम. वाघमारे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या