पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची हि मागणी...

Image may contain: 5 people, including Pralhad Vare and Pradeep Kand, people standing
पिंपरी चिंचवड, ता. १० फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): औद्योगिक परिसरातील विविध समस्या आहेत.या समस्यांनी लघुउद्योजकांना ग्रासले आहेत.या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांच्याकडे केली.पिंपरी चिंचवड महापालिकेला सर्वात जास्त महसूल औद्योगिक क्षेत्राकडून मिळतो.परंतु,या परिसरात भुयारी गटार,रस्ते मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत.

एम.आय.डी.सी. तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांसाठी पुणे येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या चर्चासत्रामध्ये अनग बलगन यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अनग बलगन यांची भेट घेतली.पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांच्या समस्याबाबत निवेदन दिले.

त्यामुळे एम.आय.डी.सी.ने टाउन शिप कार्यान्वित करून या परिसराचा विकास करावा.औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हिंजवडी एम.आय.डी.सी.प्रमाणे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात कचरा विलगीकरण केंद्र उभारावे.कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी.संघटनेचे संचालक प्रमोद राणे,एम.आय.डी.सी.चे पुणे प्रदेशिक अधिकारी देशमुख उपस्थित होते.

महापालिकेच्या गलथान कारभारामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.त्यामुळे एम.आय.डी.सी.ने आकारलेले विलंब शुल्क रद्द करण्यात यावे,अशा मागण्या निवेदनातून केल्या आहेत.निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक परिसरात पुनर्वसन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने टी-२०१ पुनर्वसन प्रकल्प एम.आय.डी.सी.कडून जागा घेऊन उभारण्यास सुरवात केली.परंतु,संघटनेच्या या मागण्याबाबत मंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांनी दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या