मला शाळा शिकवणारी माझी काळी आईच...

Image may contain: 1 person, standing and outdoor
पुणे, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त काल विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार,आणि बीजमाता राहिबाई पोपरे,त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव,भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश प्रभुणे,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले,शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ.विनोद शहा या सहा जणांना"जीवनसाधना गौरव पुरस्कार"प्रदान करण्यात आला.

राहीबाई पोपरे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं.मी तसं शाळा शिकलेली नाही,एकही दिवस शाळेला गेलेली नाही पण मी काय बोलणार तसं,पण माझी शाळा म्हटलात तर ही निसर्गाच्या कुशीमध्ये झालेली आहे,माझी शाळा काळ्या मातीमध्ये झालेली आहे,त्या मातीतल्या काळ्या आई बरोबर झालेली आहे,गेल्या वर्षी नारीशक्ती पुरस्कार घेतला आता पद्मश्री पण पद्मश्री पुरस्कार मी म्हणते माझा नाहीये.तो माझ्या काळ्या मातीचा आहे,माझ्या आईचा आहे आणि पद्मश्री म्हणला तर तुमच्या आमच्या सर्वांचा माझ्या महाराष्ट्राचा पुरस्कार आहे.

हा पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना पोपटराव पवार म्हणाले.देशामध्ये ३५० जिल्हे आणि जवळ जवळ ८ हजार गावं आणि १२ राज्य आज पाण्याचा संघर्ष करत आहेत.आणि अशा पार्श्वभूमीवर हिवरेबाजार च्या ग्रामस्थांनी गेले ३० वर्ष जे एकत्र येऊन काम केले आहे,आणि त्यांच्या ह्या प्रामाणिक प्रयत्नाला सर्व शासकीय यंत्रणेने राजकीय व्यवस्थेने या सर्वांनी जे सकारात्मक पाठबळ दिलं आहे,याच माध्यमातून आज भू-जल व्यवस्थापनाचा गौरव म्हणजे आजचा पद्मश्री पुरस्कार आहे.

डॉ. नरेंद्र जाधव,यावेळी बोलताना म्हणाले,हा पुरस्कार देण्याची प्रथा चालू केल्यानंतर आजवर विद्यापीठाच्या किमान ३ माजी कुलगुरूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे,डॉ.देवदत्त दाभोळकर,डॉ. राम ताकवले आणि डॉ. गोवारीकर या दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये माझा समावेश करण्यात आला याचा मला विशेष आनंद वाटतो.याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव,प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना"युवा गौरव पुरस्कार"प्रदान करण्यात आला.केदार जाधव सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने त्याच्या वतीनं कुटुबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या