राज्यातील ७ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात...

Image may contain: 1 person, sitting
मुंबई, ता. ११ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या तब्बल ७ हजार शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.कारण या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.त्यानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.ही परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना नोकरीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील ७ हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे  TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.उच्च न्यायालयाने TET विरोध करणारी शिक्षकांची याचिका फेटाळून लावली आहे.१३ फेब्रुवारीपासून या नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे.मात्र त्यानंतर अनेक TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षक म्हणून रुजू झाले.या शिक्षकांना ३१ मार्च २०१९ पर्यंत  TET उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आली होती.शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

या शिक्षकांचे वेतन येत्या जानेवारीपासून थांबविण्याचे आदेश शासनाने दिले आहे.या शिक्षकांनी एक संधी देण्याची मागणी याबाबत राज्याच्या शिक्षण संचालनालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे केली होती.पण ही मागणी मंत्रालयाने फेटाळून लावली आहे.TET नसलेल्या शिक्षणांच्या जागी उत्तीर्ण शिक्षकांनी नेमणूक करावी आणि अपात्र शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शासनाने घेऊ नये,असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या