पुण्यात झळकले गोंधळ उडवणारे विचित्र होर्डिंग्ज...

Image may contain: sky and outdoor
पुणे, ता. १४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): खोचक आणि कुणालाही समजू न देता टोमणे किंवा टोला लगावणे शिकावं ते पुणेकरांकडून.टोमण्यांसोबतच पुणेरी पाट्याही तितक्याच खास आणि पुणेकरांचं विशेष वैशिष्ट्ये अशा अनेक गंमतीशीर पाट्या पुण्यात अनेक ठिकाणी पहायला मिळतात.पुण्यात जवळजवळ सर्वत्रच मोठ्या काळ्या रंगाच्या होर्डिंगवर पिवळ्या अक्षरात 'सविता भाभी.तू इथंच थांब!!!' असं लिहिलेले आहे.

हे होर्डिंग्ज सध्या संपूर्ण पुण्यात लागले आहेत.या होर्डिंगवर या मजकूरा व्यतिरिक्त बाकी काहीही लिहिलेलं नसल्याने पुणेकर पुरते गोंधळून गेलेत.सध्या हे होर्डिंग्ज पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.पुण्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये या मोठमोठ्या हे होर्डिंग्ज लागले आहेत.पुणेकर कोणत्या विषयाची पाटी कशी लावतील याचा काही नेम नाही.

कधी कधी तर या पाट्यांवरच्या मजकुरामुळे गोंधळायला होत.तसाच गोंधळ आता पुन्हा एकदा उडाला आहे तो म्हणजे सध्या पुण्याच्या गल्लोगल्लीत,रस्त्यावर आणि चौकात लागलेल्या एका होर्डिंगमुळे सकाळी सकाळीच या होर्डिंग्ज नजरेत पडल्याने पुणेकरही अचंबित झाले आहेत.म्हात्रे पूर आणि परिसरातही मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लागल्याने हे होर्डिंग्ज पाहण्यासाठी तरुणांनी गर्दीही केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या