कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

Image may contain: 1 person
अहमदनगर, ता. १४ फेब्रुवारी (प्रतिनिधी): आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख आपल्याच एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत सापडले आहे.आता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथील वैद्यकीय विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे.संगमनेर येथील वैद्यकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी इंदुरीकर महाराज यांच्या घरी जाऊन ही नोटीस दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

तसंच PCPNDT अ‍ॅक्ट अर्थात प्रसुती पुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या PCPNDT अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे.गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून PCPNDT कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.अहमदनगरच्या  PCPNDT सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या वक्तव्याने ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे.

इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ 'मराठी कीर्तन व्हिडिओ' या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता.यामध्ये 'स्त्री संग सम तिथीला झाला.तर मुलगा होतो,विषम तिथीला झाला तर मुलगी होते' स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी,बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात,असं विधान इंदुरीकर यांनी केल्याचं या व्हिडिओ मध्ये दिसलं होतं.हे विधान करताना इंदुरीकर महाराजांनी थेट PCPNDT कायद्याचेच उल्लंघन केल्याचं उघडकीस आलंय.'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो,विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी,बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात.

जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत,पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण,बिभीषण,कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला. PCPNDT च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडिओ,वृत्तपत्रातील बातम्या यावर आता ह.भ.प. इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागवला आहे.यामुळे आपल्या कीर्तनातून प्रबोधनासोबतच हास्यफुलवणाऱ्या महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली असणार आहे.

इंदुरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार हे येणाऱ्या काळात कळेल.तर दुसरीकडे, भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी थेट इंदुरीकर महाराजांनाच आव्हान दिलं आहे.कीर्तनात महिलांचा वारंवार अपमान करणारे आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विरोधात मुलगा आणि मुलगी भेदभाव संदर्भात प्रबोधन करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने PCPNDT अ‍ॅक्‍टनुसार गुन्हा दाखल करा,अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.तसंच,जर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर दिनांक १८ फेब्रुवारी रोजी अहमदनगरमध्ये दाखल होणार,त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या