पुण्यात अखेर 'सविता भाभी' होर्डिंग्सचं गुढं उलगडलं...

Image may contain: outdoor
पुणे, ता. १५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही.पाट्यातून टोमणे मारणारे पुणेकर काय आयडियाची कल्पना आणतील याचा नेम नाही.अशातच सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात चक्क पॉर्न कॉमिक कॅरेक्टर असलेल्या 'सविता भाभी'च्या नावाने शहरभर पोस्टर झळकले होते.यानंतर मात्र पुणेकरांमध्ये ही सविता भाभी कोण याबद्दल उत्सुकता लागली होती.अखेर सविता भाभीचं गुढ उलगडलं आहे.ही अश्लील उद्योग मित्र मंडळ या नव्या चित्रपटाची जाहिरात असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता धर्मकीर्ती सुमंत,अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता आलोक राजवाडे यांचा हा उपक्रम आहे.ही जाहिरात त्यांच्या आगामी सिनेमाची आहे.याशिवाय त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा आवाज आहे.यामध्ये सई ताम्हणकर स्वत:ला सविता असल्याचं म्हणतं आहे.गरजेपेक्षा जास्त माहिती आहे मात्र तुम्ही तिला कधीच पाहिलं नाही.जिला कुणी कधीच पाहिलेलं नाही.असं सई म्हणाली आहे.यामध्ये एका तरुणाचाही आवाज आहे.६ मार्च २०२० मध्ये या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च होणार आहे.

अश्लील उद्योग मित्र मंडळ नावाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे.पुण्यातल्या म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिज जवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू झाली होती.या होर्डिंगवर 'सविता भाभी तू इथंच थांब!!' या आशयाचे शब्द या पोस्टरवर आहेत.सविता भाभी तू इथंच थांब म्हटल्याचे होर्डिंग पाहून पुणेकरांचे पाय थांबले आणि हसूही उमटले.होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविता भाभी नेमक्या कोण? अश्लील कॉमिक कॅरॅक्टर असलेल्या सविताभाभीचा हा संदर्भ आहे का? याबाबत काही कळू शकले नाही.येणारे जाणारे थांबून हे होर्डिंग वाचत आहेत.

काही अर्थ लागतो का ते पाहत आहेत आणि काही संदर्भ लागला नाही की रेंगाळून पुढे जात होते.पुण्यात बुचकळ्यात टाकणारे असे होर्डिंग आताच लागले नाही.याआधीही नाटक निर्माते,चित्रपट निर्मात्यांनी बॅनर बाजीची शक्कल लढवली होती.काही वर्षांपूर्वी 'दादा,एक गुड न्यूज आहे' असे पोस्टर पुण्यात झळकले होते.या पोस्टर मुळेही चांगलाच गदारोळ उडाला होता.एवढंच नाहीतर पोलिसांनी हे पोस्टर हटवलेही होते.पण,दुसऱ्या दिवशी अभिनेत्री प्रिया बापटही हे नाटकाचं पोस्टर असल्याचं जाहीर केलं.'दादा,एक गुड न्युज आहे'चं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आलं.

या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिका होती.विशेष म्हणजे,प्रिया बापटने या नाटकाची निर्मिती केली होती.बरं हा प्रकार इथंच थांबला नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये 'शिवडे आय एम सॉरी!' आणि 'सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात' या होर्डिंगनीही एकच धमाल उडवली होती.पिंपरी-चिंचवड मधील पिंपळे सौदागर,वाकड,रहाटणी परिसरात प्रियकराने 'शिवडे आय एम सॉरी!' चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले होते.हे बॅनर पाहून पोलीसही चक्रावले.तपासानंतर प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने हा प्रताप केल्याचे उघड झालं होतं.आता 'सविता भाभी'च्या नावाने पोस्टर बाजी करून नेमका काय हेतू आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या