या तीन शहरातील 2022 मध्ये मार्गांवर मेट्रो धावणार...

Image may contain: train and outdoor
पुणे, ता. १५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत तीन मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू आहे. २०२० मध्ये तीन मेट्रो प्रत्यक्ष सुरू होतील,असा विश्‍वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.त्याचबरोबर वाघोली आणि चाकण परिसरातही नागरिकांकडून मेट्रोची मागणी होत आहे. त्यानुसार या भागात मेट्रो सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPRP) तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.


जावडेकर म्हणाले,वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोची मदत होणार असून,या कामांसाठी केंद्र सरकार आवश्‍यक निधी पुरवेल.ही कामे जलद गतीने पूर्ण करावीत.हिंजवडी,वाघोलीसह गजबजलेल्या बऱ्याच भागात वाहतूक समस्या भेडसावत असून त्या दूर करण्यासाठी उपाय योजना करायला हव्यात.येत्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढू.


बैठकीला खासदार गिरीश बापट,सुप्रिया सुळे,डॉ. अमोल कोल्हे,अमर साबळे,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे,आमदार सिद्धार्थ शिरोळे,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,PMRDA मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.खासदार बापट,खासदार सुळे,खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी संबंधित लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घेऊन समन्वयातून लवकरात लवकर प्रश्‍न सोडवायला हवेत,असे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या