वाळू माफीयांनी वापरली 'या' व्यक्तीच्या नावाची गाडी...

शिरुर, ता. १६ फेब्रुवारी २०२० (मुकूंद ढोबळे ): शिरुरच्या तहसिलदार एल डी शेख यांच्यावर पाळत ठेऊन हेरगिरी करणाऱ्या वाळुमाफियांनी पळुन जाण्यासाठी शरद पवार यांची गाडी वापरल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन शरद पवारांनी ही गाडी काही दिवसांपुर्वी विकली असल्याचे निष्पन्न झाले आहे.परंतु हे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार नसुन शिरुर तालुक्यातील रामलिंगचे रहिवासी शरद पवार आहेत.

निमगाव दूडे (ता.शिरुर) येथे सुरू असलेल्या वाळू उपशावर कार्यवाही करण्यासाठी निघालेल्या शिरुरच्या महिला तहसिलदार एल डी शेख यांना त्यांच्या रेव्हेन्यू कॉलनी घराबाहेर हेरिगिरी करण्यासाठी दबा धरून बसलेल्या ७ ते ८ वाळू माफियांनी त्यांना अरेरावी करून त्यांच्या पतीशी झटापट करून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याने खळबळ उडाली असुन याबाबत शिरुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तहसिलदारांनी पोलिस खात्याकडे गुन्हा दाखल केल्याने वाळुमाफिया धास्तावले असुन शिरुर मध्ये न्याय दंडाधिकारी दर्जाचा अधिकारी देखिल सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचे काय...? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला असुन तालुक्यात कायदा व सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

निमगाव दुडे (ता.शिरुर) येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाळू व मुरूम उपसा होत असल्याची तक्रार तहसिलदार एल डी शेख यांच्या मोबाईल वर आली होती.त्यामुळे गुरुवारी पहाटे सुमारे ३:५० च्या सुमारास तहसिलदार कारवाईसाठी बाहेर पडत असताना काही वाळुमाफीया तहसिलदारांच्या शासकीय निवास्थाना बाहेर गाडीमधे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवत होते.त्या मधील एक तस्कर गेटमधुन आत मधे सतत डोकावत होता त्याला तहसिलदार शेख व त्यांचे पती यांनी विचारणा केली असता.त्यांनाच दमबाजी करण्यांचा प्रयत्न तस्करांच्या या हेरांनी केला.त्यावेळी तहसिलदार शेख यांचे पती आणि वाळुमाफीयामधे झटापट झाली त्यामुळे तस्करांचा मोबाईल खाली पडला.त्यानंतर हे दोन्ही हेर पसार झाले.पोलिसांना संपर्क साधला मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्यांने ६ ते ७ तस्कर येऊन पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी गाडी घेऊन पसार झाले आहेत.

या झटापटीत वाळू माफियाचां मोबाईल तहसीलदार शेख यांच्या हाती लागला आहे. हल्लेखोर ७ ते ८ जण असल्याचे तहसीलदार शेख यांनी सांगितले.त्यामुळे  शिरुर तालुक्यात वाळू माफियांची दहशत वाढत असुन पोलीस प्रशासन मात्र गप्प का...? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शिरुरच्या तहसीलदार एल डी शेख यांच्या घराची रेकी करणे, त्यांच्यावर पाळत ठेवणे असा प्रकार नेहमीच होत असून ११ फेब्रुवारी असाच त्याचा गाडीचा पाठलाग करीत असल्याची तक्रार त्यांनी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दिली होती.वाळू माफियांच्या  हाती लागलेल्या मोबाईल मध्ये प्रांत अधिकारी,तहसिलदार शिरुर,तहसिलदार खेड,नायब तहसिलदार शिरुर यांचे दिवसभराचे लोकेशन घेतले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

याबाबत अधिक माहीती घेतली असता शिरुरच्या तहसिलदार एल डी शेख यांनी सांगितले की,या मोबाईल मधे वाळुमाफीया महसुल अधिकारी यांची लोकेशन माहीती देणारे ग्रुप असुन याद्वारे वाळु तस्करांना माहीती पुरविली जाते.याग्रुप मधे अनेक वाळुमाफीया सक्रीय असुन हे अनेक वेळा तहसिलदार शेख यांचा शिरुर तहसिल कार्यालयापासुन ते घर किंवा अगदी पुण्यापर्यंत पाठलाग करतात त्याबाबत त्यांनी शिरुर तसेच रांजणगाव पोलिसांकडे तक्रारी देखील केल्या आहेत मात्र तस्करांच्या लक्ष्मी दर्शनामुळे खाकी वर्दी अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत असल्यांचे चित्र आहे .

शिरूर तालुक्यात मोठया प्रमानात वाळु उपसा सुरू असुन, तहसिलदार शेख यांनी अनेक वेळा रात्री अपरात्री जीव धोक्यात घालुन तस्कराच्या वर कारवाई करतात.त्यांनी सुमारे दिड कोटीचा दंड वसुल केला आहे .महिला अधिकारी असुन सुद्धा पोलिस मात्र सुरक्षा देण्यास टाळाटाळ करीत असल्यांचे तहसिलदार एल डी शेख यांनी सांगितले.मागच्या वर्षी पारनेरच्या तत्कालीन तहसिलदार भारती सागरे यांना शिरुर मधील वाळु माफियांनी शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या घोडनदीवर हल्ला करीत रॉकेल ओतुन पेटवुन देण्यांची घटना घडली होती.तसेच एका तहसिलदारांच्या गाडीवर हल्ला,एका तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करणे.तसेच एका नायब तहसिलदाराला बेदम मारहाण करण्यात आली होती.या गुन्हयामधील आरोपी शिरुरमधीलच होते.

शिरुरच्या महिला तहसिलदार एल डी शेख यांच्याबाबत झालेला प्रकार गंभीर असुन आरोपीचा मोबाईल मिळाल्याने पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळणे सोपे झाले आहे .यामधे अनेक आरोपी असुन संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का नुसार कारवाई करण्यात येईल असे तहसिलदार शेख यांनी सांगितले . तहसीलदार एल डी शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर सरकारी कामात अडथळा,दहशत करणे, धाक दाखविणे,संगणमत करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास प्रविण खाणापुरे करीत आहे .

अन...पोलीसही पडले चिंतेत
शिरुरच्या तहसिलदार एल डी शेख यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची हेरगिरी करून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले तरुण आय ट्वेन्टी गाडीतुन आले होते त्या गाडीचा क्रमांक  MH 12 QY 3168 गाडीतून आले होते. ही गाडी शरद पवार यांच्या नावावर असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली होती.परंतु शिरुर  तालुक्यातील रामलिंग गावचा  शरद पवार नावाचे व्यक्ती असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनीही सुस्कारा सोडला.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या