हिवरे कुंभार गावची हिवरे बाजाराकडे वाटचाल...

Image may contain: one or more people, people standing, tree, outdoor and nature
शिक्रापूर, ता. १७ फेब्रुवारी २०२० (विशाल वर्पे) :  हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील युवकांनी एकत्र येऊन गावच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.ग्रामपंचायतचे माजी पदाधिकारी सामूहिकरित्या एकत्र येऊन गावातील सार्वजनिक ठिकाणची साफसफाई करत आहेत.त्यामुळे हिवरे कुंभार गावच्या युवकांनी परिसरातील गावांना आदर्श घालून दिला आहे.त्याच्याबरोबर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत मोडकळीस आली.हे लक्षात घेऊन गावातील प्रमुख गावकऱ्यांनी गावची यात्रा रद्द करून यात्रेची जमा झालेली वर्गणी हि शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी खर्च केली आहे.


हिवरे कुंभार या गावची सध्या वाटचाल हिवरे बाजारच्या दिशेने सुरू आहे.त्यामुळे गावातील ग्रामस्थ या युवकांचे कौतुक करत आहेत.गावात एखादी दुःखद घटना घडली कि युवक मदतीसाठी तात्काळ धावून जातात,याची प्रचिती अनेक वेळा गावकऱ्यांना आली आहे.काही दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थिनी साक्षी कुंभार हिला सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान हाताला इजा झाली होती.साक्षीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या युवकांनी  व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांना मदतीचे आव्हान करताच गावकऱ्यांनी तब्बल साठ हजार रुपये जमा केले होते.मात्र हि गोष्ट शिक्रापूर येथील डॉ. पोटे यांच्या लक्षात आल्यानंतर डॉ. पोटे यांनी साक्षीवर निम्म्या किंमतीतच उपचार केले.

त्याचप्रमाणे गावातील युवक अमित जाधव याला देखील मेंदूच्या शाश्त्रक्रियेसाठी व्हाट्सअपच्या माध्यमातून तब्बल दोन लाखांची मदत मिळवून दिली.युवक आणि जेष्ठ ग्रामस्थांच्या विचारांची देवाणघेवाण कारण्यासाठी गावातील प्रत्येक युवकाचा वाढदिवस गावातील शक्य त्या ग्रामस्थांना बोलावून गावातच साजरा केला जातो.त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते.यावेळी व्यसन मुक्तीचा संदेश दिला जातो.गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करण्यासाठी महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत केली जाते.


या उपक्रमात अनेक युवक आणि ग्रामस्थ सहभागी होतात.त्याचबरोबर स्वच्छता करून शक्य तेवढी झाडे लावली जातात.वृक्षारोपानासाठी ग्रामस्थांना आवाहन केले जाते.या स्वच्छता मोहीमेमध्ये सरपंच विकास शिर्के,माजी सरपंच राहुल टाकळकर,माजी सरपंच राजाराम गायकवाड,दत्तात्रय गायकवाड,बाजीरांग गुंजाळ,दीपक जगताप,परशुराम साळुंके,दादाभाऊ गायकवाड,अरुण साळुंके,सोमनाथ आडाळगे,पांडुरंग मांदळे,सुरेश टाकळकर,अमोल झेंडे आदी युवक प्रामुख्याने हिरहिरीने भाग घेऊन ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देतात.त्यामुळे हिवरे कुंभार हे आदर्श गावाकडे वाटचाल करत आहे.

whatsaap चा असाही वापर

दुःखद आणि सुखद घटना ग्रामस्थांना कळवणे,संकटसमयी मदतीला धावणे,उद्याच्या स्वच्छतेची सार्वजनिक जागा कळविणे,नवीन योजना कळविणे,ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी सुचवलेली विकास कामाची माहिती देणे,नवीन शासन निर्णय कळविणे,सार्वजनिक कामासाठी आवाहन करणे,या आणि अशा अनेक प्रकारच्या विधायक कामासाठी whatsaap ग्रुपचा वापर केला जातो.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या