वाळूतस्करांना अटक न केल्यास काम बंद आंदोलन...

शिरूर, ता. १७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): शिरूरच्या तहसीलदार एल.डी. शेख यांच्या शासकीय निवासस्थानी (दि. १४) पहाटे साडेतीन वाजता अज्ञात वाळू तस्करांनी हल्ला करून त्यांना दमदाटी केल्याच्या निषेधार्थ शिरूर तालुका तलाठी व मंडल अधिकारी व शिरूर तालुका महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना,पोलीस पाटील संघटना,कोतवाल संघटना यांच्या वतीने जोपर्यंत यातील आरोपींना अटक होत नाही.तोपर्यंत शिरूर तालुक्‍यात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोटे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.


यावेळी निवासी नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे,महसूल नायब,तहसीलदार ज्ञानदेव यादव,जिल्हा संघटना सचिव निलेश घोडके,शिरूर तालुका तलाठी संघटना अध्यक्ष विजय बेंडभर,सचिव सर्फराज देशमुख,तालुका मजूर संघटनेचे अध्यक्ष तीर्थ गिरी गोसावी,उपाध्यक्ष एकनाथ ढाके,महसूल कर्मचारी तलाठी महिला कर्मचारी उपस्थित होते.शिरूर तहसीलदार लैला शेख व सर्व कर्मचारी असुरक्षित आहेत.

वाळू माफियांनी तहसीलदारांवर केलेला हल्ला निषेधार्थ आहे.यातील आरोपींचा मोबाइल मिळाला असून याद्वारे त्वरित आरोपींना अटक करावी.अन्यथा (दि. १५) पासून शिरूर तालुक्‍यातील तलाठी,मंडल अधिकारी संघटना,महसूल अधिकारी,कर्मचारी संघटना,कोतवाल संघटना शिरूर तालुक्‍यात कामबंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे महसूल कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता.शिरूर तालुक्‍यात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपसा होत आहे.या उपशाबाबत तक्रारी येत असतात.यावेळी महसूल कर्मचारी नायब तहसीलदार,अधिकारी,तलाठी यांना कार्यवाहीसाठी जावे लागते.


परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सर्व अधिकाऱ्यांच्या मोबाइल लोकेशन वाळू तस्करांच्या वतीने घेण्यात येत आहे.तहसीलदार,नायब तहसीलदार,प्रांत अधिकारी,तलाठी यांचेही लोकेशन घेतले जात आहे.त्यांच्या घराची रेकी केली जात आहे.दिवसा-रात्रीत यांच्या घराच्या बाहेरून विना नंबरच्या गाड्या फिरवले जात आहेत.त्यांच्यावर पाळत ठेवली जाती आहे.प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यावर हे वाळू माफिया भ्याड हल्ले करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या