शिरुर बाजार समितीतच कांदा विक्रीस आणावा...

पुणे, ता. १७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): सध्या खरीप व लेट खरीप कांद्याचे उत्पादन सुरू झाले आहे.शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवरच विक्रीसाठी आणावा.शेतावर जर शेतमाल विकला.तर त्यांचे वजन,बाजार भावामध्ये फसवणूक होऊ शकते.तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही.त्यामुळे बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डवर दर बुधवार,शुक्रवार आणि रविवारी कांदा विक्रीसाठी आणावा,असे आवाहन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी केले.


कांदा हे पीक शेतकऱ्यांचे नगदी पीक असून जवळचे मार्केट असल्यामुळे शिरूर मार्केट यार्डवर शिरूर,पारनेर,श्रीगोंदा,खेड,दौंड,जुन्नर तालुक्यातून आवक होत आहे.शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नवीन मार्केट यार्डवर भरत असणाऱ्या कांदा मार्केटमध्ये कांद्याची दररोज मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.आठवड्यातील दर बुधवार,शुक्रवार आणि रविवारी कांद्याची जाहिर लिलावाने विक्री होत आहे.रविवारी (दि. १६) रोजी सुमारे १० हजार ७३३ गोण्याची आवक झाली.चांगल्या कांद्यास सुमारे ६०० ते २५५० प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाले.


बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविण्यासाठी शेड,लाईट,स्वच्छतागृह,CCTV कॅमेरे आदि आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारलेल्या आहेत.पुणे,नगर आणि नाशिक जिल्हयामध्ये गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून हा कांदा टिकाऊ असून त्यास चांगली मागणी असते.येथील कांदा कर्नाटक,आंध्रप्रदेश,केरळ,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,झारखंड,आसाम आदि राज्यामध्ये विक्रीसाठी जात आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या