इंदुरीकर महाराजांचे भक्त्यांना शांत राहण्याचे आवाहन...

Image may contain: 1 person
अहमदनगर, ता. १७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): इंदुरीकर महाराज आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत सापडले आहेत.आज इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि भक्तांसाठी एक खास पत्र लिहिलं आहे.सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे चाहते तसंच भक्तमंडळी मैदानात उतरले आहेत.आपण आपली बाजू शांततेत आणि कायदेशीररित्या मांडणार आहोत.भक्तांनी कृपया शांतता राखावी,सोशल मीडियामधून कोणत्याही प्रकारची बाजू मांडू नये,असंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.इंदुरीकर महाराजांनी पत्र लिहून भक्तांना शांततेचं आवाहन केलं आहे.वारकरी सांप्रादाय हा शांतताप्रिय आहे.आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी महाराजांनी पत्र लिहिलं आहे.कोणतीही रॅली,मोर्चे तसंच आंदोलन करू नका,असं आवाहन त्यांनी पत्राच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना केलं आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई तसंच अंनिसने महाराजांविरूद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या