शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला...

Image may contain: one or more people, people sitting and indoor
पुणे, ता. १८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या आता आणखी एका पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे.शिवाजीचे उदात्तीकरण पडद्यामागचे वास्तव या पुस्तकात महाराजांच्या विषयी वादग्रस्त भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे.या पुस्तकावर आता आक्षेप घेण्यात येत आहे.महाराजांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला असून,त्यातील मजकूर कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे.मागासवर्गीय आणि बहुजन समाजात तेढ निर्माण करणारे हे पुस्तक असल्याची चर्चा आहे.भारतीय जनता पक्षाने ही मागणी केली आहे.

या पुस्तकात काही आक्षेपार्ह प्रकरण या पुस्तकात असल्याचं बोलले जात आहे.विनोद अनाव्र्त यांनी हे पुस्तक लिहिल्याचे समजतंय तर विलास वाघ यांच्या सुगावा प्रकाशनातर्फे सदर पुस्तक प्रकाशित आहे.शिवाजीचा महानतेचा बागुलबुवा असेल किंवा हिंदू नावाच्या बाटलीत शिवाजी नावाची दारू अशी अनेक वादग्रस्त प्रकरणे यात दिली आहेत.शिवाजी महाराज हे मराठ्यांचे दैवत नव्हते,ते खंडणी वसूल करत,अशी भाषा या पुस्तकात वापरली आहे,असा आरोप भाजपाने केला आहे.


या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विनोद अनाव्रत हे मूळचे नागपूरचे आहेत.त्यांच्यावर आणि पुस्तक प्रकाशक,सुगावा प्रकाशन संस्थेच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.अनेक संतापजनक,विकृत आणि समाजात तेढ पसरवारे अत्यंत अश्लाघ्य विचार या पुस्तकात मांडले आहेत.या पुस्तकातील कांही प्रकरणाची शीर्षके आणि उपशीर्षके अतिशय आक्षेपार्ह आहेत.यावर आता राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रोकठोक भूमिका घेतली आहे.

शिवाजीचे उदात्तीकरण या विनोद अनाव्रत लिखित पुस्तकाशी मी सहमत नाही पुस्तकावर कायदेशीर बंदी घातली पाहिजे.याबाबत मी राज्यशासनाकडे लवकरच लेखी मागणी करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे.प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या अस्मितेचे प्रतिक आहेत.त्यांचा अपमान होईल असे बोलणे वा लिहीणे हा देशद्रोह समजून विनोद अनाव्रत व संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व शिवाजीचे उदात्तीकरण या पीतपुस्तिकेवर ताबडतोब बंदी घालावी अशी मा.मुख्यमंत्र्यांकडे मी आग्रही मागणी करतो असं वाघ यांनी म्हटलं आहे.तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग आपल्या मुस्लिम विरोधी किंवा ब्राम्हण विरोधी राजकारणासाठी करणारे तथाकथित शिवप्रेमी समूह आश्चर्यकारक पद्धतीने गप्प बसल्याचे समोर येत आहे.


नुकतेच भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील समान गुणांची तुलना केलेल्या पुस्तकाचा वाद ताजा असताना आता या वादात आणखी या पुस्तकाची भर पडली आहे.दिल्लीच्या भाजप कार्यालयात 'धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'पुस्तक प्रदर्शित करण्यात आले यानंतर अवघ्या महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली होती आता या पुस्तकावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या