राज्यात २ कोटी ४१ लाख सातबारे उतारे डिजिटल...

Image may contain: grass, outdoor and nature
पुणे, ता. १८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): राज्यात २ कोटी ४१ लाख सातबारे उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.ते नागरिकांना डाऊनलोड करून घेता येत आहेत.त्यासाठी ऑनलाइन पैसे भरता येत आहेत.एका १५ रुपये आकारण्यात येतात.आतापर्यंत ७ लाख ५ हजार ऑनलाइन पद्धतीने सात-बारा उतारे घेण्यात आले असून,यातून शासनाला १ कोटी ५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

भूमि अभिलेख विभागाने सात-बारा,फेरफार आदी दस्तावेज ऑनलाइन उपलब्ध केले आहेत.यापूर्वी सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.तसेच ई-फेरफारअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली जात आहे.योजनेचा पुढचा भाग म्हणून ऑनलाइन सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात येत होते.त्यामध्ये एक पाऊल टाकत भूमी अभिलेख विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेले सात-बारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली आहे.

संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे मिळत आहेत.राज्यात एकूण २ कोटी ५१ लाख सात-बाराउतारे असून त्यापैकी २ कोटी ४१ लाख उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध आहेत.पुणे जिल्ह्यात सुमारे ९७ टक्के सातबारे उतारे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध आहेत. राज्यात सर्वाधिक डिजिटल सातबारे डाऊनलोड करण्याचे प्रमाण पुणे जिल्ह्यात आहे.पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार १९३ इतके सातबारा उतारे डाऊनलोड झाले आहे.त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात ५८ हजार इतके सातबारे उतारे डाऊनलोड करण्यात आले आहे.

डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्यावर प्रिंट काढल्याची तारीख व वेळ आहे.त्याचबरोबर डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा खरा आहे की खोटा,हे तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.या उताऱ्यावर १६ अंकी क्रमांक आहे.'महाभूमि' संकेतस्थळावर हा क्रमांक पाहून त्याची सत्यता पडताळून पाहता येते.राज्यात दररोज सरासरी ८ ते ९ हजार सात-बारा उतारे डाऊनलोड करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या