अजित पवारांच्या या कृतीवर मनसेने स्तुतिसुमने उधळली...

Image may contain: 2 people, eyeglasses
मुंबई, ता. १८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मुंबईतील माझ गाव येथे असलेल्या GST  भवनाला भीषण आग लागली होती.इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली होती.ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २० बंब घटनास्थळी दाखल झाले होते.ही आग काही वेळानंतर नियंत्रणात आली.मात्र या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

तसेच ही आग लेव्हल-३ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान,आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांनी बोलावलेली बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते.मुंबईत होतो म्हणून घटनास्थळी वेळेत पोहोचलो.दुसऱ्यांचं ऐकून सूचना देण्यापेक्षा स्वत: हजर राहून सूचना दिलेल्या केव्हाही चांगलं.त्यामुळे तातडीने इथे पोहोचलो अस अजित पवार म्हणाले आहेत.त्यामुळे आपल्या कामामुळे कायम चर्चेत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्परता पुन्हा दिसली आहे.

अजित पवारांच्या या कृतीवर मनसेने तुफान स्तुतिसुमने उधळली आहेत.अजित पवार हे खूप संवेदनशील नेते आहेत.तसेच राज्याला करोडो रुपयांचं महसूल मिळवून देणारं अर्थखातं असल्यामुळे अजित पवार आणि जीएसटी भवनच्या इमारतीचं खास नातं असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.त्याचप्रमाणे अजित पवार इतर कोणत्याही कामासाठी नेहमी आग्रही असल्याचे सांगत अजित पवार जीएसटी भवनाला लागलेल्या आगीची कसून चौकशी करतील असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

आगीची माहिती मिळताच अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते.तसेच आगीत किती नुकसान झाले आहे, त्याची माहिती घेतली जाईल.मी अधिकाऱ्यांना विचारले त्यांनी माहिती दिली की सर्व डेटा आपल्याकडे आहे.सर्व डाटा कॉम्प्युटराईज आहे.तसेच,मला माहिती देण्यात आली की,सर्व सुरक्षित आहे,असे अजित पवार म्हणाले.याशिवाय,अशा घटना घडता कामा नये.आपण मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सूचना दिली होती की,सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीत करुन घ्या.यासंदर्भात तपास करण्याची जबाबदारी सरकार घेईल.तसेच GST भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार,असेही अजित पवार यांनी सांगितले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या