आणि रोडरोमिओंची झाली पळापळ...

Image may contain: 2 people, people walking, people standing and outdoor
शिक्रापूर, ता. १९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): येथील विद्याधाम प्रशाला परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत विनाकरण फिरणाऱ्या व मुद्दाम मोठ्याने आवाज करीत वाहन चालवणाऱ्या २५ वाहनचालक रोडरोमिओंवर कारवाई करीत त्यांच्याकडून १० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.तर गाडीमध्ये फेरफार केलेल्या ७ गाड्या शिक्रापूर पोलिसांनी जमा केल्या आहेत.तर रोडरोमिओंच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलत त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे.

अचानक झालेल्या या कारवाईमुळे रोडरोमिओंची'पळताभुई थोडी'झाली.येथे मोठ्याने आवाज करत,विनाराकण गिरक्‍या मारणाऱ्या युवकांवर कारवाई करत सर्वांची वाहने ताब्यात घेतली.त्यानंतर काही अल्पवयीन युवकांकडे दुचाक्‍या मिळून आल्याने त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात येथे बोलाविण्यात आले,तसेच पालकांना देखील समज देत वाहनांवर दंड आकारण्यात आला.


शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर,तळेगाव ढमढेरे परिसरातील महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबत तक्रारी पोलिसांकडे आल्या त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) तळेगाव ढमढेरे येथे रोडरोमिओंवर कारवाई केली त्यांनतर शनिवारी (दि, १५) शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला परिसरात पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी,पोलीस नाईक राजेंद्र मदने,ट्राफिक वार्डन किरण थोरात यांनी विद्याधाम प्रशाला परिसरात रोडरोमिओंवर कारवाई करण्याचा बागडा उचलला.


तर काही वाहने देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.त्यामुळे रोडरोमिओंनी देखील चांगलाच धसका घेतला आहे.शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक बुलेट वाहन चालकांनी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेला आहे,त्यामुळे दुचाक्‍यांच्या सायलेन्सरमधून मोठ्याने आवाज होतो हे आरटीओ नियमाच्या बाहेर आहे,अशा वाहनांवर कारवाई करून या वाहनांची तक्रार आरटीओ विभागाकडे करणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या