३९० व्या शिवजयंतीचा उत्साह...

Image may contain: 2 people, people sitting and indoor
पुणे, ता. १९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९० वी जयंती आहे.राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह दिसतोय.शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर विशेष सोहळा होणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.यासोबतच राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.


आज सकाळी पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसकर व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे हस्ते शिवाई देवी अभिषेक व महापुजा संपन्न झाली. ९:३० वाजता महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन किल्ल्यावर होईल.यावेळी ते शिवाई मंदिर ते शिवजन्म स्थळ पर्यंत पालखी मध्ये सहभागी होतील.यांनतर महिलांचा पाळणा कार्यक्रम होईल.किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा उत्सव साजरा होईल.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.यांनतर तलवार बाजी मर्दानी खेळ मंत्र्यांच्या उपस्थितीत सादर केले जातील.तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राजमाता जिजाऊ व बालशिवाजीच्या पुतळ्यास पुष्पहारअर्पण करतील व अभिवादन सभा होणार आहे.यांनतर किल्ल्याच्या पायथ्याशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवप्रेमींचा जाहीर मेळावा संपन्न होईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या