दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर काय करावे?

Image may contain: people sitting and screen, text that says 'Online Banking'नवी दिल्ली, ता. २१ फेब्रुवारी २०२० : अनेक जण आपल्या मित्रांना,कुटुंबियांना पैसे पाठवताना नेटबँकिंग,मनी ट्रान्सफर,मोबाईल वॉलेट,RTGS, NEFT याचा वापर करताना दिसतात.त्वरित पैसे पाठवण्याची ही सुविधा सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे.पण ही सुविधा जितकी सोपी आहे,तितकी जोखमीचीही आहे.आपल्या चुकीने दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तुमच्या बँकेत त्वरित याबाबत सूचना द्या.तुमच्या सूचनेच्या आधारे बँक त्या व्यक्तीला बँकेला सूचना देईल ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत.चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्यासाठी बँक त्या व्यक्तीची परवानगी मागेल.ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना झालेली एक छोटीशी चूक चांगलीच महागात पडू शकते.RTGS, NEFT करताना चुकीच्या नंबरमुळे,पैसे चुकून कोणाच्या दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले तर? पैसे परत कसे मिळणार? पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तात्काळ बँकेला याबाबत सूचित करा.तुमचं आणि पैसे ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीची बँक एकच असल्यास ही प्रोसेस जलद होण्यास मदत होते.पैसे एक-दोन दिवसांत पुन्हा खात्यात जमा होऊ शकतात.


ज्या व्यक्तीला पैसे चुकून ट्रान्सफर झाले आहेत,तो व्यक्ती पैसे परत करण्यास नकार देत असल्यास,त्याच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करता येऊ शकते. पैसे परत न केल्यास,हा अधिकार आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्याच्या संदर्भात आहे.भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,लाभार्थ्याच्या खात्याची योग्य माहिती देणे ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी आहे.जर,काही कारणास्तव,केवळ लिंक करणाऱ्याकडून चूक झाल्यास बँक जबाबदार असणार नाही.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या