शिरूर तालुक्यातील भावाने केली बहिणीच्या घरी चोरी

Image may contain: one or more people, night and sky
शिरूर, ता. 22 फेब्रुवारी 2020 (पोलिसकाका): आजारी आईला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या भावानेच तिच्या घरामध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (ता. 16) सायंकाळी पाच वाजता महमदवाडी येथे घडली. रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या भावाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

नितीन शिवाजी भाकरे (वय 35, रा. टाकळी हाजी, माळवाडी, शिरुर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या आई आजारी असल्यामुळे त्या रविवारी त्यांच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादीच्या घरी त्यांचा सख्खा भाऊ व त्याच्यासमवेत एक महिला आली होती. त्यावेळी फिर्यादी घरी नव्हत्या. त्यामुळे आरोपीने त्यांच्या घरातील 37 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल, घरातील चाव्या, एटीएम कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस कर्मचारी सुरेखा साबळे करीत आहेत.अंत्यविधीला जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला...

अंत्यविधीला जाणाऱ्या सादलगाव (ता. शिरूर) येथील भीमराव ज्ञानदेव जगताप (वय 32) यांचा पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. भीमराव हे गुरुवारी (ता. 20) काकांचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी पुणे-सोलापूर महामार्गाने दुचाकीवरून कुसेगाव (ता. दौंड) येथे निघाले होते. रात्रीच्या वेळी वरवंड-पाटस दरम्यान जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात भीमराव यांच्या डोक्‍यास व छातीत गंभीर मार लागला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


सातकरवाडी दरोड्यातील दोन आरोपी गजाआड...

सातकरवाडी-पारोडी (ता. शिरूर) येथे दहा दिवसांपूर्वी मुलगा रात्री शेतात गेल्यावर त्याच्या घरावर दरोडा टाकून आईला गंभीर जखमी करणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांना गजाआड केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. मनसुख ऊर्फ निगऱ्या आर्पण भोसले (वय 30, रा. पारनेर, जि. नगर) किरण म्हस्के (वय 25, रा. सांगवी सूर्या, ता. पारनेर, जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पारोडीतील सातकरवाडीत टाकलेल्या दरोड्यात पार्वतीबाई शहाजी सातकर (वय 65) यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात पार्वतीबाई यांचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या