करंदी सोसायटीच्या संचालकाची सचिवाला मारहाण...

Image may contain: one or more people, people standing and shoes
शिक्रापूर, ता. २२ फेब्रुवारी २०२० (विशाल वर्पे): करंदी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकानेच सचिवाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
करंदी सोसायटीचे सचिव किरण दत्तात्रय नप्ते (रा. करंदी ता. शिरूर) यांनी मंगळवारी (ता. १८) सोसायटीचे संचालक कोंडीबा चिमाजी साबळे आणि संभाजी बबन कंद्रुप दोघेही (रा. करंदी ता. शिरूर) यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. संचालक साबळे यांनी सचिव नप्ते यांच्या गैरहजेरीत घरी जाऊन कार्यालयात उपस्थित नसल्याच्या कारणावरून कुटुंबियांना बडबड केली. त्यानंतर संचालक साबळे यांना सचिव नप्ते यांनी माझ्या घरी जाऊन बडबड का केली याची विचारणा केली असता साबळे यांनी सोसायटी कार्यालयाच्या आवारात येऊन दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, दगड घेऊन धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे साबळे यांनी नप्ते यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सचिव नप्ते यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने संचालक साबळे हे पोलिस पाटील यांचे सासरे असल्यामुळे पोलिसांची याबाबत टाळाटाळ दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस पाटील यांच्या कुटुंबियांना पोलिस यंत्रणा पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे. पोलिस पाटील यांच्याच कुटुंबातील सदस्य अश्या प्रकारचे गुन्हे करत असतील तर गावात होणाऱ्या गुन्ह्यांना कसे रोखणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.दरम्यान, सचिव किरण नप्ते यांना वरिष्ठ कार्यालयाचा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहण्यासाठी आदेश असल्याने नप्ते कार्यालयात उपस्थित नव्हते. मात्र, याबत इतर संचालक मंडळाशी चर्चा न करता साबळे यांनी अशा प्रकारचे कृत्य केल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अजिनाथ शिंदे करत आहेत.


संचालक मंडळाला याबाबत कुठलीही माहिती साबळे यांनी दिली नव्हती, त्यामुळे साबळे यांचा तो व्यक्तिगत विषय आहे, त्यात संचालक मंडळाचा काहीही संबंध नाही, असे माधुरी ज्ञानेश्वर दरेकर (चेअरमन, वि. वि. सोसायटी, करंदी) यांनी सांगितले.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या