कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार जाहीर...

Image may contain: sky and outdoorमुंबई, ता. २२ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता २८ फेब्रुवारी रोजी तयार होणार आहे.याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.ही यादी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती,मात्र यासाठी सरकारने मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आकस्मिकता निधीत १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला.तरी त्या निर्णयावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही.


या कर्जमाफी योजनेसाठी संबंधित शेतकऱ्यांचे आधारकार्ड बॅंक खात्याशी जोडले असणे आवश्यक आहे.तर काही ठिकाणी अजूनही आधारकार्ड शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी जोडले गेलेले नाहीत.हे निदर्शनास आले आहे.याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे,अशांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अधिवेशन काळात नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.या योजनेनुसार सप्टेंबर २०१९ पर्यंत २ लाख रुपयांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.त्यासाठी आकस्मिकता निधीत १५हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सोमवारपासून (ता. २४) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे.या योजनेचा लाभ सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या