हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल...

Image may contain: one or more people and hat
पुणे, ता. २५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): आपण अनेकदा बघत असतो की रस्त्यावर किंवा स्टेशनवर अनेक गरीब लोक भीक मागत बसलेले असतात.काही मिळालं नाही तर उपासमारीचा सामना अनेकदा या लोकांना करावा लागतो.अनेकदा घरात कोणीही जेवलं नाही तर केलेलं अन्न वाया जातं.पण असे अनेक लोक आहेत ज्यांना दोन वेळचं नाहीच पण एकवेळचं सुद्धा जेवण मिळत नाही.आता असाच एका वृद्धाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.यामध्ये वृद्ध चक्क चपाती धुवून खाताना दिसत आहे.


डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीयो व्हायरल होत आहे.हा व्हिडिओ समोर आला असला तरी नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे समजू शकलेलं नाही.एका रेल्वे स्टेशनवर तो असल्याचं दिसतं.त्याच्या हातात चपाती असून तो नळावर येऊन चपाती धुत असल्याचं दृश्य दिसतं.चपाती धुतल्यानंतर ती खात असलेलंही व्हिडिओमध्ये दिसतं.


एक हात अधु असलेल्या त्या वृद्धाचा व्हिडिओ पाहून मन हेलावून जातं.ट्विटरवर एका युजरने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की,करत 'ये भूख ही तो है,जो किसी से पेट भरने पर रोटी फिकवा देती है और किसी से उसी रोटी को दुबारा उठवा के धुलवा लेती है'त्यावर अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.अशी वेळ कोणावर येऊ नये अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या