महापालिकेतही आता "तुकडे तुकडे गॅंग'...

Image may contain: sky, text and outdoor
पुणे, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी केलेल्या नियमांचा सोयिस्कर वापर करत प्रभागातील विकासकामांच्या निविदा ठराविक ठेकेदारांना मिळवून देण्याचा घाट घातला जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने हा प्रताप केला आहे.या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग ३० मधील शाळेच्या विद्युत विषयक कामांसाठी प्रत्येकी ८ लाख ९२ हजारांच्या २ निविदा काढल्या असून प्रभागातील विद्युत कामाच्या नावाखाली ७ लाख ७९ हजारांची निविदा काढली आहे.


या निविदेचा खर्च २५ लाखांपर्यंत झाल्यास अतिरिक्‍त आयुक्‍तांची तर,त्यापेक्षा अधिक झाल्यास स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागली असती.त्यामुळे एकाच कामाचे तीन तुकडे करून ही निविदा काढली आहे.सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रभाग ३० मधील शाळा तसेच शाळेचे वायरिंगसाठी ८ लाख ९२ हजार ७४७ रुपयांची निविदा,त्यानंतर विद्युत विषयक काम करणे या नावाखाली ८ लाख ९२ हजार ८३१ रुपयांची आणखी एक निविदा तसेच प्रभात ३० मध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी ७ लाख ८९ हजार १७५ रुपयांची निविदा काढली.


या कामांसाठी ६० दिवसांची मुदतही दिली आहे.प्रत्यक्षात ही तिन्ही कामे विद्युत विषयक असून २ कामे एकाच शाळेच्या विद्युत दुरुस्तीची आहेत.त्यांची रक्‍कम सुमारे १७ लाख होते.त्यामुळे हे काम क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारात करणे शक्‍य नव्हते.तसेच,ते अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे मान्यतेसाठी गेल्यास त्यावर आक्षेप काढले गेले असते.तर तिन्ही कामे एकाच स्वरुपाची असल्याने त्यांच्या निविदांची रक्‍कम २५ लाखांवर गेली असती तर ती स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आणावी लागली असती.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या