पुणे महापालिकेचे ७ हजार ३९० कोटींचे अंदाजपत्रक सादर...

Image may contain: one or more people, people standing, people sitting and indoor
पुणे, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): महापालिकेचे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचे सुमारे ७ हजार ३९० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी मुख्यसभेत सादर केले.पालिकेच्या उत्पनवाढीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल वाढ समितीच्या भरवशावर स्थायी समितिचे अंदाजपत्रक आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा तब्बल ११०० कोटींनी फुगविण्याचे धाडस समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले आहे.


महापालिका आयुक्तांनी ६ हजार २२९ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते.स्थायी समितिच्या अंदाजपत्रकात ४०० कोटी कर्ज तसेच आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून जाहिरात उत्पन्नाचे २५० कोटीसह,बांधकाम विभागाचे २०० कोटीचे तसेच मिळकत कराचे ३०० कोटीचे वाढीव उत्पन्न गृहीत धरले आहे.


या अंदाजपत्रकात शहराच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या २ महत्वाच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यात 'जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय आणि सारसबाग आणि पेशवे पार्क एकत्रित करून अंतरराष्ट्रीय उद्यान विकसित करणे,आंबील ओढा पुनर्विकास,मध्यवर्ती शहरात प्रवासासाठी १० रुपयात वर्तुळाकार बस सेवा,अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य संमेलन,नानाजी देशमुख रुग्णालय,शहरात तीन ठिकाणी अतिदक्षता रुग्णालय,पालिका शाळेतील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी,स्मार्ट व्हिलेजही उभारण्यात येणार आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या