MSSC मध्ये राज्यात सरकारी नोकरीची 'सुवर्ण'संधी...

No photo description available.
मुंबई, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation) पुरुष सुरक्षा रक्षक पदांच्या ७००० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे,यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२० असणार आहे.


पद आणि पदसंख्या - पुरुष सुरक्षा रक्षक ७००० जागा

अर्ज करण्याची अंतिम तारीख - मेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२० पर्यंत देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२ वी पास असणे आवश्यक आहे.

वयाची अट - अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांदरम्यान असावे,उमेदवारांचा जन्म ३१ जानेवारी १९९२ ते ३१ जानेवारी २००२ दरम्यानचा असावा.

शुल्क - अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क म्हणून २५० रुपये भरावे लागतील.

वेतनमान -निवड झालेल्या उमेदवारांना वेतन म्हणून १७,००० रुपयांपेक्षा अधिक पगार देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण - परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरीची संधी मिळेल.


अर्ज प्रक्रिया - अर्ज ऑनलाइन करायचा असून त्यापूर्वी उमेदवारांनी http://www.mahasecurity.gov.in/images/msf/pdf/Website २५०२२०२०.pdf या लिंकवर जाऊन परिक्षेचे नोटीफिकेशन वाचून घ्यावे,त्यानंतर अर्ज करावा.

उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php या वेबसाइटवर जावे.या वेबसाइटवरुन उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन दाखल करु शकतात.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या