पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक...

Image may contain: 1 person
पुणे, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली.या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे.बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस.व्ही.जाधव,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ,बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे.अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत.पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आर्थिक बेशिस्तीमुळे या बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल ९ कोटी रुपये थकले आहेत.त्यामुळे या ठेवीदारांनी बँकेचे संचालक तथा आमदार अनिल भोसले यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.पण हे आमदार भोसले सहकारमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने सहकार खातं त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलक ठेवीदारांनी केला.


शिवाजीराव भोसले बँकेने ठेवीदारांचे तब्बल ९कोटी रुपये थकवले आहेत.बँकेच्या उरळी कांचन शाखेत ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत.कुणी शेत विकून बँकेत पैसे ठेवलेत तर कुणी आयुष्याची पुंजी या बँकेत ठेवली आहे.पण आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व बँकेने या बँकेवर कारवाई सुरू केल्याने या ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळेनासे झाले आहेत.बँकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसलेंवर कारवाईची मागणी ठेवीदारांनी केली आहे.बँकेच्या या आर्थिक बेशिस्तीविरोधात ठेवीदारांनी सहकार खात्याकडेही तक्रार केली आहे.पण बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलक विकास लवांडे यांनी केला आहे.


या बँकेच्या पुणे या परिसरात एकूण १४ शाखा आहेत.गेल्या वर्ष भरापर्यंत या बँकेचा कारभार सुरळीत सुरू होता.पण संचालकांनी बेसुमार कर्जवाटप केल्याने ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे.अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर,मार्च २०१९ पर्यंत बँकेत ४५० कोटींच्या ठेवी होत्या.बँकेमार्फत तब्बल ३१६ कोटींचं कर्जवाटप करण्यात आलं आहे.पण ६० टक्के कर्ज हे बुडीत खात्यात जमा ? मोठ्या खातेदारांनी पैसेे काढताच बँक अडचणीत आली आहे.सध्या बँकेकडे फक्त ३७५ कोटींच्या ठेवी आहेत.आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व बँकेनं या बँकेवर अनेक निर्बंध घातले असले तरी बँकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या दोषींवर कधी कारवाई होणार याबद्दल याची विचारणा ठेवीदारांकडून केली जात आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या