पुण्यात भोंदू बाबाकडून ५ अल्पवयीन बहिणींवर बलात्कार...

Image may contain: one or more people
पुणे, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड भागात एक धक्कादायक घटना घडली आहे.पूजा करण्याच्या बहाण्यानं बलात्कार करणाऱ्या आरोपी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.घरात खजिना शोधण्याच्या बहाण्यानं या भोंदू बाबानं घरात शिरकाव केला आणि कुटुंबातल्या ५ बहिणींवर बलात्कार केला.पीडितांमध्ये ४ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.ज्याचं वय १० ते १९ यादरम्यान आहे.या नराधमानं त्या मुलींना याबाबतची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी देत कोणालाही सांगितल्यावर आई- वडिलांना मारून टाकेन असं म्हटलं होतं.


सर्वात धक्कादायक घटना म्हणजे या भोंदू बाबानं पीडितांपैकी एकीसोबत बनावट लग्न सुद्धा केलं.आरोपीचं नाव सोमनाथ कैलाश चौहान ऊर्फ भाई असं आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार,५ पीडितांपैकी मोठ्या बहिणीनी सोमवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार ही घटना जानेवारी आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये घडली आहे.रायगडमधल्या रोहा इथला राहणारा सोमनाथ याचं वय ३० आहे.पीडित कुटुंबियांसोबत त्याचे पूर्वीपासूनचे संबंध होते.

त्यानं पीडित मोठ्या बहिणीला सांगितलं की,तुमच्या घरात कुणीतरी काळी जादू केली आहे.जे हटवण्यासाठी काही विधी पूजा करावी लागेल.या पूजेनुसार तुमच्या घरात खजिना सुद्धा आहे.तो देखील मिळण्याची शक्यता आहे.ही पूजा करण्यासाठी तो बऱ्याचंदा त्यांच्या घरात राहायचा सुद्धा.पूजा करण्यासाठी त्यानं पीडित मुलींना कपडे काढून पूजा करण्यासाठी सांगितलं होतं.या ५ ही पीडिता चुलत बहिणी आहेत.५ मुलींपैकी एक मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या आईनं पोलिसांत तक्रार केली.

त्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरूवात केली गेली.त्यानंतर मुलींशी बोलल्यानंतर पोलिसांना समजलं की,या मुलीनं आपल्या मर्जीनं सोमनाथ सोबत लग्न केलं आहे.मुलीची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला.तो म्हणजे,सोमनाथ त्या मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करायचा.जेव्हा अन्य मुलींना याबाबत विचारलं असता समजलं की,बाकीच्या मुलींसोबतही सोमनाथ तसंच करायचा.आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२०१३ च्या ब्लॅक मॅजिक प्रोटेक्शन कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या