या कारणावरून सलमान खानच्या अडचणीत वाढ...

Image may contain: 2 people, suit
मुंबई, ता. २६ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांच्या मोठ्या चर्चा आहेत.यंदाच्या वर्षांत अक्षय कुमार,सलमान खान यांसारख्या सुपरस्टार्सचे धमाकेदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.सलमान खानचा 'राधे' यंदाच्या ईदला रिलीज होत आहे.तर अक्षय कुमार लक्ष्मी बॉम्ब,सूर्यवंशी असे २ सिनेमा यंदाच्या वर्षांत रिलीज होत आहे.पण आता अक्षय कुमारमुळे सलमान खानच्या समोरील अडचणी वाढल्या आहे.जाणून घेऊयात या दोघांमध्ये अशा कोणत्या कारणानं तणाव निर्माण झाला आहे.अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात तसं पाहायला गेलं तर काही वैर नाही.


काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं आमिर खानसाठी त्याच्या एका सिनेमाची तारीख पुढे ढकलली होती.असंच काहीसं सलमानच्या सिनेमाबाबतही घडलं आहे.सलमानचा राधे आणि अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार आहे.त्यामुळे या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.राधे सिनेमाच्या मेकर्सनी हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार हे आधीच सांगितलं होतं पण आता लक्ष्मी बॉम्ब सुद्धा याच दिवशी रिलीज होणार आहे.


सलमान खान दरवर्षीच त्याचा सिनेमा ईदच्या दिवशीच रिलीज करतो.या दिवशी रिलीज होणारा सिनेमा सर्वाधिक कमाई करतो.त्यात करून सलमानच्या होम प्रोडक्शनखाली तयार झालेल्या राधेचं वितरण यशराज फिल्म्स करणार आहे.त्यामुळे हा सिनेमा त्यावेळी रिलीज होणाऱ्या सर्वच सिनेमांवर भारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.राधे सिनेमाचा धमाकेदार टीझर होळीला रिलीज होणार आहे.प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी कमाली उत्सुकता आहे.अशात राधेच्या रिलीज डेट दिवशीच अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सुद्धा रिलीज होणार असल्यानं सलमानच्या अडचणी वाढल्या आहेत.कारण मागच्या वर्षी सलमानच्या तुलनेत अक्षय कुमारचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर सरस ठरले होते.त्यामुळे आता हे दोन्ही अभिनेते रिलीज डेटच्या बाबतीत तडजोड करतात की हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज होतात हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या