जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने विदयार्थी गहिवरले

Image may contain: 19 people, people standing and crowd
शिरुर,ता. २७ फेब्रुवारी २०२० (मुकुंद ढोबळे): सकाळी ११ ची वेळ... विद्याधाम शाळेची घंटा वाजली... कोणी आमदार ...कोणी एसीपी... कोणी डॉक्टर.. कोणी माजी उपनगराध्यक्ष... कोणी उद्योगपती... कोणी डायरेक्टर कोणी शिक्षक तर कोणी अधिकारी सर्वजण एका रांगेत चिडीचूप ४५ वर्षानंतर क्रीडाशिक्षक वसंतराव वंजारी सर यांच्या त्याच सावधान विश्राम च्या सूचना आणि राष्ट्रगीत सुरू... राष्ट्रगीत संपताच आपापल्या वर्गात विद्यार्थ्यांची वर्गात जाण्याची लगबग सुरू...
आमदार अशोक पवार हजर सर.. एसीपी बनकर हजर... अ‍ॅड शिरीष लोळगे येस सर... कमल सावंत हजर सर... डॉक्टर सुभाष गवारी हजर.. उद्योजिका सुरेखा धारिवाल.. हजर... व्यापारी शिरीष बरमेचा हजर... शेतकरी नामदेव काळे हजर...वर्गाची पटसंख्या आणि उपस्थिती ७९ अनेक जण आज परत हजर वर्ग होता १९७५ एसएससी बोर्ड चा... ४५ वर्षानंतर ७९ विद्यार्थी हजर होते आणि ज्या हातांनी शिस्त आणि अभ्यास करण्यासाठी पाठीवर धपाटे... आणि हातावर डस्टर आणि छडी लगावली ते थरथरणाऱ्या हाताच्या वयस्क शिक्षकांनी मात्र आज मायेने  आणि प्रेमाने पाठीवरून आणि काहींच्या गालावरून हात फिरवताना मात्र वय वर्ष ५० च्या पुढच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मात्र स्वर्गसुखाचा आनंद घेताना डोळ्यांच्या कडा ओघळताना दिसून आल्या आणि १९७५ च्या जुन्या आठवणीत दिवसभर विद्यार्थी रमून गेले आणि साथीला होते त्याकाळचे तेच शिक्षक असा सोहळा पाहून शिक्षकांबरोबर विद्यार्थीही गहिवरून गेले होते.


सकाळी ९ वाजल्यापासून शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती शाळेच्या आवारात ठेवलेल्या एका टेबलावर नाव नोंदणी सुरु होती आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पाने स्वागत केले जात होते प्रत्येकाला ओळखपत्र आणि १९७५ एस एस सी अशी नाव छापलेली टोपी देत होते. आलेला प्रत्येक विद्यार्थी मोठ्या आनंदात आणि एकमेकांना गळाभेट नमस्ते करून आनंद व्यक्त करत होता हा आनंद होता शिरूर विद्याधाम प्रशाला येथील १९७५ एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या गेट-टुगेदर चा.

सकाळी ११ नंतर प्रार्थनेनंतर दिवंगत विद्यार्थी शिक्षक यांना दोन मिनिटे स्तब्ध थांबून मौन बाळगले.त्यानंतर मोठ्या घाईत विद्यार्थी वर्गात गेले तास सुरू होण्यासाठी शाळेचे तत्कालीन शिपाई आनंदराव पाचर्णे यांनी घंटा वाजवली आणि शाळेला सुरुवात झाली पहिल्या सत्रात  हजेरी घेण्यात आली चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशाला ऑडिटरियल मध्ये घेऊन गेले तेथे सर्व विद्यार्थ्यांनी आसन ग्रहण करून आलेल्या शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला.यानंतर २५ वर्षानंतर भेटलेल्या विद्यार्थ्यांची ओळख आणि विशेष विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.पहिले सत्र संपताच जेवणाची सुट्टी ची घंटा वाजली आणि सर्वच विद्यार्थांनी जेवणासाठी केलेल्या सुग्रास भोजनाचा लाभ घेतला.


दुपारच्या सत्राची घंटा वाजली आणि दुपारनंतर ची शाळा सुरू झाली यामध्ये आमदार अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त करताना शिरूर तालुक्यात दोन वेळा भूषवलेल्या आमदारपद त्याकाळात केलेली विकास कामे चालू आमदारकीच्या काळात असेल विकासकामांचे व्हिजन याची माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिली.त्यानंतर शिरूर चे आमदार अशोक पवार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या कमल सावंत यांचा सत्कार विद्यार्थी आणि शाळेच्या वतीने घेण्यात आला.त्यानंतर तु म परदेशी सर,घ.वा करंदीकर सर,वसंतराव वंजारी सर,जगताप सर,दैठणकर सर,सारडा सर, जांबेकर मॅडम,नायडू मॅडम यांची मनोगते झाली.

त्यानंतर विद्यार्थी शिरीष लोळगे,नंदिनी जगताप,कमल सावंत,चित्रा पुरंदरे,शांता चाबुकस्वार,राजेंद्र इसवे,डॉक्टर सुभाष गवारी,बिजवंत शिंदे,बाळासाहेब बनकर किशोर मुथा,वसंत झांजे,गोरख जामदार,किशोर जासुद,शिरीष बरमेचां,प्रफुल्ल सूर्यवंशी,पोपट ओस्तवाल,सतीश संघवी या विद्यार्थ्यांची मनोगते झाली.यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति असणारी कृतज्ञता व जिव्हाळा म्हणून शाळेला व गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी निधी जमा करण्यात आला.


त्यानंतर शाळेत फोटो काढण्यासाठी तयार केलेल्या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी काढल्या तसेच ग्रुप फोटो झाला आणि अचानक विद्यार्थी कावरेबावरे झाले एकमेकांना पहात राहिले.काहीजण शिक्षकांच्या भोवती गोळा झाले एकमेकांचे नंबर घेऊ लागले.एकमेकांचा पत्ता घेऊ लागले एकमेकांना फोन करत जा ख्याली खुशाली सांगत जा कोणी हातात देत होते तर कोणी गळाभेट घेत होते.कोणाला शिक्षक आशीर्वाद देत होते तर कोणाला त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देत होते.विद्यार्थी शिक्षकांना तब्येतीची काळजी घेत जा असे सांगत असताना मात्र पाय कुणाचा निघत नव्हता.

परंतु उद्यापासून आपल्या नेहमीच्या काम धंद्यांना जावे लागणार होते.यासाठी प्रत्येकाने आपल्या बॅगा घेतल्या एकमेकांच्या डोक्यावर घातलेल्या १९७५ लिहिलेल्या टोप्या कडे पाहत होते.विद्यार्थी विद्यार्थिनी चे हाय बाय सुरू होते प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढत होती आणि मग सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला एक कटाक्ष शाळेच्या चौहुं बाजूंच्या भिंतीवर टाकला शिक्षकांचे चरण स्पर्श केले आणि आणि डोळ्याच्या कडा ओलावत गहिवरून जात पुन्हा भेटण्याच्या इराद्याने पुन्हा एकदा शाळेला पाठ दाखवत प्रत्येक जण पुन्हा एकदा नव्या आठवणी घेत निघून गेले ती पुन्हा भेटण्याची इराद्यानेच...

No photo description available.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या