निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ...

Image may contain: 1 person
नगर, ता. २८ फेब्रुवारी २०२०२ (प्रतिनिधी): कीर्तनकार इंदुरीकर यांच्याविरुध्द अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.पुरावे दिल्यास कारवाई करू’,अशी भूमिका जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली होती.सायबर सेल पोलिसांनी इंदुरीकरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला होता.त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना त्या’व्हिडिओबाबतचे पुरावे दिले आहेत.मात्र पुरावे देऊनही १५ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास इंदुरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध फिर्याद दाखल करू,असा इशारा अंनिसच्या राज्य कार्यवाह अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी आज दिला.अंनिस’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की इंदुरीकर यांनी मूळ जन्माबाबतचे वादग्रस्त वक्तव्य उरण तालुक्यातील इंचगिरी येथे २ जानेवारी रोजी केले होते.ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यानंतर यू-ट्यूब चॅनेलवर दबाव आणून ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले.


इंदुरीकर यांनी असेच वक्तव्य फेब्रुवारी २०१९ मध्ये नगर जिल्ह्यातील शेलद येथेही केले आहे.इंदुरीकरांच्या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२० रोजी नोटीस पाठविली.त्यानंतर इंदुरीकर यांनी बीड येथे कीर्तनात त्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले.त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली.सरकारी वकील आणि वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.असे स्पष्टीकरण नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या