या कारणावरून सोनाक्षी सिन्हानं केला मोठा खुलासा...

Image may contain: 1 person
मुंबई, ता. २८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हानं आपल्या करिअरमध्ये येणाऱ्या चढ-उतारांवर मोठा खुलासा केला आहे.सोनाक्षीनं अ‍वॉर्डवरून बॉलिवूडला चपराक लगावली आहे.आत्तापर्यंत आपण कोणाकडे काम मागितलं नसून,हा आपल्या नावावर मोठा रेकॉर्ड असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे.सोनाक्षी सिन्हा ही पहिली अभिनेत्री आहे.जिनं गेल्या १० वर्षात बॉक्स ऑफिसवर १५०० करोडची कमाई केली आहे.सोनाक्षीनं एका मुलाखती दरम्यान करिअरमधील मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.यामध्ये सोनाक्षीनं तिची नाराजी बोलून दाखवली असल्याचं समोर आलं आहे.


ज्या पद्धतीनं आपल्या चित्रपटासाठी सन्मान मिळायला हवा होता त्यापद्धतीनं सन्मान मिळाला नसल्याचं यावेळी सोनाक्षीनं सांगत आहे.आणि बॉलिवूडवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.'दबंग' चित्रपटाशिवाय फॅन्सनी तिच्या कोणत्याही चित्रपटाला पसंती दिली नाही.असं असलं तरी देखील सोनाक्षीनं आपल्या अ‍ॅक्टिंग आणि चबी लुकमुळे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.दंबग गर्ल सोनाक्षीला आत्तापर्यंत बॉलिवूडमधला कोणताही मोठा अवॉर्ड मिळालेला नाही.आमिर खान आणि कंगना सारख्या अभिनेत्यांनी हे सिद्ध केलं आहे,की बॉलिवूडमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना अवॉर्ड मिळत नाही.या अवॉर्डमध्ये मला कोणताही रस नसल्याचं सोनाक्षीनं म्हटलं आहे.

बॉलिवूडमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना अवॉर्ड मिळत नाहीत,लोक प्रेम देतात यातच मी खूश असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे.जर कोणाचा मित्र आहे म्हणून मला अवॉर्ड मिळणार असले तर मला असा अवॉर्ड नको असल्याचं बोलत तिनं इतर कलाकारांना सुनावलं.सोनाक्षीच्या'लुटेरा' चित्रपटाला २०१४ मध्ये बेस्ट अ‍ॅक्टरेस्टसाठी नॉमिनेशन देण्यात आल होतं.'दबंग' चित्रपटासाठी फिल्मफेयर अवॉर्ड देखिल मिळाला.मात्र गेल्या ६ वर्षाच सोनाक्षीला एकही अवॉर्ड मिळालेला नाही.याविषयी बोलताना सोनाक्षीनं मोठा खुलासा केला आहे.


जेव्हा मी विचारलं,तुम्ही ज्याला याआधी पॉपुलर चॉईस अवॉर्ड मिळालेल्या व्यक्तीला अवॉर्ड कसं काय दिलं आहे.त्यावर धक्कादायक उत्तर आलं आहे,ज्याला हा अवॉर्ड मिळाला त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं.'हे उत्तर अजब असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे.सोनाक्षीनं एका मुलाखती दरम्यान बोलताना,बॉलिवूडमध्ये लोक येतात,मित्र बनवतात आणि नंतर निघून जातात,या क्षेत्रात मला कोणाचं चमचा बनून काम करणार नसल्याचं बोलत सोनाक्षीनं नाराजी बोलून दाखवली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या