पुणे म.न.पा.आडमुठ्या धोरणामुळे कचरा प्रश्न ऐरणीवर...

Image may contain: outdoor and nature
पुणे, ता. २९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुण्यातील उरुळी फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी ५ दिवसांपासून कचरा डेपो बंद केल्यामुळे पुण्यातला कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे.कचराअद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली आहे.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी गेल्या ४ दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे.कचरा प्रश्नावर महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करूनही अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली आहे.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं माजी आमदारांच्या नातेवाईकाच्या भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट दिलं आहे.या कंपनीला २३ कोटी ४५ लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं.


कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती साधनं नसल्याचं आढळून आल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला.त्यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका फुरसुंगी आणि तेथील स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे.उरळी आणि फुरसुंगीकरांनी कचरा टाकू देण्यास मनाई केली आहे.त्यामुळं गेल्या ५ दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही.त्यामुळं अनेक सोसायट्यांमध्ये कचरा तसाच पडून आहे.पुणेकर दररोज २ हजार टन कचरा करतात,त्यापैकी फक्त ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होते.


दुसरीकडं कचरा डेपोमुळं होणारं प्रदूषण,दुर्गंधी,साथीचे आजार आणि डासांची पैदास यामुळं उरळी आणि फुरसुंगीकर हैराण आहेत.पालिका प्रशासननं ग्रामस्थांकडे १० एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे.२०१५ मध्ये देखील याच कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं.तेव्हाही कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक साधन सामग्री नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राट दाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता.विशेष म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं ६०० कोटींची तरतूद केली आहे.तरीदेखील पुण्यात कचऱ्याचा प्रश्न निकाली लागत नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या