त्याच्यावर बलात्काराचा आरोप होता पण...

Image may contain: text
पुणे,ता.१ मार्च २०२० (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणातून विशेष न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी एका तरूणाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.ती मुलगी स्वत:हून तरूणासोबत पळून गेली.त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहिल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अमित बाळासाहेब सुतार (रा. वढु बुद्रुक, ता. शिरूर) असे त्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अ‍ॅड सुनीता बन्सल आणि अ‍ॅड नितीश चोरबेले यांनी बाजू मांडली. २५ डिसेंबर २०१६ रोजी तिला घरातून अनोळख्या व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती.ती पोलिसांनी ६ जानेवारी २०१७ रोजी मिळून आली.

तपासात त्याने लग्नाच्या अमिषाने पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.पुराव्यामध्ये ती १७ वर्षाची असून,पीडित आणि मुलगा याचे प्रेमसंबंध होते.ती स्वत:हून मुलाच्या गाडीवर पळून गेल्याचे निष्पन्न झाले.बचाव पक्षातर्फे अ‍ॅड सुनीता बन्सल आणि अ‍ॅड नितीश चोरबेले यांनी काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या