राज्यातील RTE प्रवेशासाठी दुप्पट अर्ज...

Image may contain: 1 person
पुणे, ता. २ मार्च २०२० (प्रतिनिधी): राज्यातील RTE प्रवेशाच्या एकूण १ लाख १५ हजार २९८ जागांसाठी एकूण २ लाख ८१ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत.त्यात पुण्यातील १७ हजार जागांसाठी ६० हजार विद्यार्थ्यांनी,तर नागपूरमधील ६ हजार जागांसाठी ३० हजार विद्यार्थ्यांनी आणि औरंगाबाद मधील ५ हजार जागांसाठी १५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.मात्र प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपली असली,तरी अर्ज कन्फॉम करण्यासाठी येत्या ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो.त्यासाठी शिक्षण विभागाने १२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते.राज्यातील ९ हजार ३३१ शाळांमधील RTE च्या जागांसाठी शिक्षण विभागाकडे २९ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ८१ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले आहेत.तर कोल्हापूर वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.कोल्हापूर जिल्हा RTE प्रवेशात मागे असल्याचे दिसून येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात RTE प्रवेशासाठी ३४५ शाळांनी नोंदणी केली असून,  शाळांमध्ये RTE च्या ३ हजार ४८६ जागा उपलब्ध आहेत.या जागांसाठी केवळ २ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४७ जागांसाठी ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.


नागपूर जिल्ह्यात ६ हजार ७९७ जागा असून,या जागांच्या ५ पट म्हणजे ३० हजार ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.राज्याच्या शिक्षण विभागातर्फे  RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.परंतु, अर्ज कन्फॉम न केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा काही कारणास्तव अर्ज भरायचा राहून गेला असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना येत्या ४ मार्चपर्यंत अर्ज भरता येईल.त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्या दिनकर टेमकर,सहसंचालक,प्राथमिक शिक्षण,महाराष्ट्र राज्य.

RTE प्रवेशाची आकडेवारी

पुणे           १७,०५७ ६०,५२०
नागपूर       ६,७९७ ३०,०५५
नाशिक      ५,५५३ १७,०७०
औरंगाबाद  ५,०४३ १५,९३३
ठाणे          १२,९१५ १९,४२१
मुंबई         ५,७७१ १२,१५१


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या