पतीचा बदला घेण्यासाठी तिनं घेतला चिमुकल्याचा जीव...

Image may contain: one or more people
राजस्थान, ता. २ मार्च २०२० : राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एका महिलेला तिच्या ४ वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे.रविवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या आरोपी महिलेने आपल्या पतीचा बदला घेतल्यासाठी आपल्या चिमुकल्या मुलाला पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून हत्या केली.सुनीतासह कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी करण्यात आली.एस.पी म्हणाले की,"चौकशी दरम्यान सुनिताने मुलाची हत्या केल्याचे कबूल केले.तसेच पोलिसांना संशय येऊ नये आणि पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी म्हणून तिने तिच्या हाताची नस कापून घेतली."विवानची हत्या केली कारण ती पतीशी झालेल्या भांडणामुळे नाराज होती आणि तिला तिच्या चारित्र्यावर शंका होती.या दाम्पत्यात दररोज भांडण होत असे.त्यामुळे पत्नीने पतीचा राग मुलावर काढत त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.'याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे एस.पी पुढे म्हणाले.


झुंझुनूचे पोलीस अधीक्षक (एस.पी) जगदीश चंद्र शर्मा यांनी सांगितले की, बुढानिया गावाच्या पन्नाराम येथे शनिवारी सकाळी मंदरेला पोलीस ठाण्यात पोचले आणि ४ वर्षांच्या विवान स्वामी आणि मुलाची आई सुनीताने नस कापल्याबद्दल अज्ञात लोकांनी गुन्हा दाखल केला.शर्मा पुढे म्हणाले की,'फॉरेन्सिक विभाग आणिडॉग स्कॉडसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.सुनीताच्या पलंगावर डॉग स्क्वॉडला रक्ताने माखलेले ब्लेड आढळले.तसेच बेडजवळच फरशीवर रक्ताचे डाग आढळून आले.त्यामुळे पोलिसांच्या मानत संशय निर्माण झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या