पुरंदर विमानतळासाठी तयार करणार विशेष मार्ग...

Image may contain: airplane and outdoor
पुणे, ता. २ मार्च २०२० (प्रतिनिधी): प्रस्तावित पुरंदर विमानतळावर लवकर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने सातारा,सोलापूर,कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांचा विचार करण्यात येत आहे.त्यादृष्टीने पुरंदर विमानतळासाठी विशेष मार्ग तयार केला जाणार आहे.त्याकरिता ४ रस्त्यांचा विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.हडपसर-बोपदेव-दिवे-सासवड रस्ता,उरळीकांचन ते दिवेघाटमार्गे सासवड,तसेच PMRDA आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC ) करण्यात येणारे प्रत्येकी एक असे दोन वर्तुळाकार मार्ग विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडले जाणार आहेत.पुरंदर विमानतळावर दळणवळणाची साधने,प्रवाशांना विमानतळाकडे जाण्यासाठी आणि येण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या घटकांचा विचार करण्यात येत आहे.


विमानतळ विकसित करणे आणि विमानतळ झाल्यानंतर प्रवाशांसह इतर घटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे,हे दोन्ही वेगळे भाग आहेत.विमानतळाकडे जाण्या-येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहजरित्या देण्याबाबत आराखडा तयार करण्यात येत आहे MSRDC कडून हाती घेतलेल्या रिंगरोडच्या पूर्व भागातील दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.४ तालुक्‍यांतून हा रस्ता जाणार असून सुमारे ६२ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या