गुनाट-निमोणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे

शिंदोडी, दि ३ (तेजस फडके): शिरुर-तांदळी रस्त्यावर असणाऱ्या निमोणे-गुनाट या २ किमी लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे.अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात येथे गंभीर अपघात झाले असुन अनेकांना या खड्यांमुळे पाठदुखीचा त्रास होत आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम खाते मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

              
निमोणे-गुनाट हा २ किमीचा रस्ता असुन या रस्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतुक चालते.विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते.परंतु ६ महिन्यातच हा रस्ता उखडला आहे.त्यामुळे रस्त्याचे कामच निकृष्ट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या रस्त्याची दुरुस्ती लवकरत लवकर करण्यात यावी अशी मागणी निमोणे व गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.


याबाबत शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता एम आर सोनवणे यांच्याकडे चौकशी केली असता."आठ दिवसात चव्हाणवाडी ते निर्वी या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे त्यांनी "www.shirurtaluka.com" शी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या