या १६ गावांमधील कुत्र्यांनी केला ७२ जणांवर हल्ला...

Image may contain: 1 person, dog and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. ४ मार्च २०२० (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे, ता. ४ मार्च २०२० (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १६ गावांमधील ५७२ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला.या सर्वांना रेबीजची प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरुंजवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, कोरेगाव-भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, धानोरे या सोळा गावांचा समावेश आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १ लाख २ हजार ४८८ एवढी आहे.ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांचा उपद्रवही वाढलेला आहे.त्यामुळे ठिकठिकाणी ही कुत्री माणसांवर हल्ला करून जखमी करण्याचे प्रमाण वाढत आहे.वर्षभरात १६ गावांतील ठिकाणच्या कुत्र्यांनी ५७२ लोकांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.शहरी भागात महापालिकेमार्फत मोकाट कुत्र्यांना बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत.त्याप्रमाणे ग्रामीण भागातही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले की,ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा आहे.अशा नागरिकांनी कुत्र्याला दिली जाणारी रेबीजची लस द्यावी.तसेच नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुत्रा चावण्यापूर्वीचही रेबीजची लस घ्यावी.श्‍वानदंश झालेल्या व्यक्तीस प्राथमिक आरोग्य केंद्रात ०,३,७,२८ या दिवसांप्रमाणे लसीचे ४ डोस दिले जातात.जखमेवरील लस ससून सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध आहे.जास्त प्रमाणात जखम झाली असल्यास अशा व्यक्तींना ससून रुग्णालयात पाठवले जाते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या